चोरट्यांची छवी सीसीटीव्हीत कैद ; साडेआठ लाखांची रोकड वाचली
भुसावळ- शहरातील वर्दळीच्या जामनेर रस्त्यावरील नवशक्ती आर्केडमधील इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न दोघा चोरट्यांनी केला मात्र सुदैवाने कॅश ट्रेश न उघडल्याने तब्बल साडेआठ लाखांची रोकड सुरक्षित राहिली. चोरी करणार्या चोरट्यांची छवी सीसीटीव्हीत कैद झाली असून त्या आधारे बाजारपेठ पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी बँकेचे शाखाधिकारी आशिषकुमार आनंदलाल सोनडिया (भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहेत.