भुसावळात इलेक्ट्रॉनिक दुकान पेटले : लाखोंचे नुकसान

0

भुसावळ- जामनेर रोडवरील नाहाटा चौफुलीजवळ नवदीप इलेक्ट्रॉनिक दुकानाला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दुकानातून धूर निघत असल्याचे कळाल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले मात्र तो पर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. पालिकेच्या दोन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तो पर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. आग लागल्यानंतर नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. गजेंद्र बाळू जंगले यांच्या मालकिचे नवदीप इलेक्ट्रॉनिक दुकान असल्याचे सांगण्यात आले.