भुसावळात उद्या केरळ पूरग्रस्तांसाठी मदतफेरी

0

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने केले मदतीचे आवाहन

भुसावळ- केरळमध्ये पावसामुळे आलेल्या महाप्रलयानंतर आपत्तीग्रस्त नागरीकांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बुधवार, 29 रोजी शहरातील दोन भागातून मदतफेरी काढण्यात येणार आहे. नागरीकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन अनिल कुलकणीर्र् यांनी एका पत्रकान्वये केले आहे.

दोन भागातून निघणार मदतफेरी
शहरातील अष्टभूजा देवी मंदिर भागातून निघालेली मदतफेरी ब्राह्मण संघ, मरीमाता मंदिर, सराफ बाजार, पंजाब नॅशनल बँक, एलआयसी कार्यालय, शिवाजी कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचेल तर खडका चौफुली भागातून दुसरी मदतफेरी निघून, अमरपदी टॉकीज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मॉडर्न रोड, गांधी चौक, अमर स्टोअर्स, शिवाजी कॉम्पलेक्सपर्यंत पोहोचणार आहे. केरळमधील घटना दुर्देवी असून तेथील नागरीकांच्या मदतीसाठी दात्यांनी सरळ हाताने मदत करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.