भुसावळात उद्या नाना-नानी उद्यानाचा शुभारंभ

0

आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

भुसावळ- भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील वेडिमाता मंदिर रस्त्यावरील काशीराम नगरात स्व.अटलबिहारी वाजपेयी नाना-नानी उद्यानाचा शुभारंभ आमदारांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता होत आहे. या शिवाय प्रोफेसर कॉलनीतील महादेव मंदिराचा जीर्णोद्धारही आमदारांच्या हस्ते होत आहे.

ज्येष्ठांना काठी वाटप
उद्घाटन कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठांना काठी वाटप तसेच लग्नास 50 वर्ष पूर्ण झालेल्या जोडप्यांना भेटवस्ते देवून सन्मानीत करण्यात येईल तसेच चिमुकल्यांना खेळण्यांचे वाटप केले जाणार आहे. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकार्‍यांची उपस्थित राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन नगरसेवक युवराज लोणारी व भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा मीना लोणारी यांनी केले आहे.