भुसावळात उद्या निशुल्क दमा, अस्थमा निदान शिबिर

0

भुसावळ- शहरातील सिंधी कॉलनीतील गुरूनानक सेवा मंडळात निशुल्क दमा, खोकला, अस्थमा निदान शिबिर बुधवार, 24 रोजी दुपारी चार ते सात दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. संत शिरोमणी स्वामी प्रेमदास थल्हा दरबारच्या सौजन्याने हे शिबिर होत असून रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुरुनानक सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.