भुसावळ- शहरातील सराफा बाजारातील गुरूनानक फॅशनमागे प्रशस्त अशा पतंजली (श्री हरी आयुर्वेद) सुपर शॉपचे उद्घाटन सोमवार, 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता राजस्थानी वि.प्र.समाजाचे अध्यक्ष डॉ.कमलकांत शास्त्री यांच्या हस्ते होणार आहे. प.पू.स्वामी रामदेवजी महाराज यांच्या आशीर्वादाने सुरू होत असलेल्या या सुपर शॉपच्या दालनात एकाच छताखाली विविध वस्तू मिळणार असल्याने ग्राहकांची मोठी सोय होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बर्हाटे असतील.
यांची राहणार विशेष उपस्थिती
उद्घाटन कार्यक्रमास नगरसेवक पिंटू कोठारी, नगरसेवक रमेश नागराणी, समाजसेवक अनिल जैन, माहेश्वरी समाज अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, अवधेश दुबे, गोपाळ मंत्री, बनवारीलाल अग्रवाल, भवरलाल प्रजापत, डॉ.संदीप जैन, डॉ.योगेंद्र कासट, डॉ.निलेश झोपे, हेमंत चौधरी, छबीलदास बर्हाटे, जे.एच.चौधरी, सीमा जावळे, अर्चना भगत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन महेश (नट्टू) झंवर व अमित अग्रवाल यांनी केले आहे.