भुसावळात उद्या भागवत सप्ताहाची सांगता

0

भुसावळ- शहरातील जुना सातारा भागातील काशीराम नगरात स्व.रोशनी प्रल्हाद बोंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित श्रीमद भागवत कथा व अखंड हरीनाम सप्ताहाचे 17 ते 24 दरम्यान आयोजन करण्यात आले होते. शनिवार, 24 रोजी सकाळी नऊ वाजता नंदू महाराज, रणशूर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताहात 17 रोजी कथेला प्रारंभ झाला. 18 रोजी महर्षि नारदमुनी व व्यास चरीत्र, 19 रोजी श्री प्रल्हाद चरीत्र, 20 रोजी गजेंद्र कथा, वामन अवतार, 21 रोजी श्री परशुराम जन्मोत्सव, 22 रोजी श्रीकृष्ण लिला, 23 रोजी उद्धव गीता राजा परीक्षीत उद्धार व कथा समापन झाले. 23 रोजी सायंकाळी दिंडी काढण्यात आला. सप्ताहादरम्यान दररोज पहाटे विविध धार्मिक कार्यक्रम झाला. यशस्वीतेसाठी वेडिमाता भजनी मंडळ, राम मंदिर भजनी मंडळ, सुदर्शन मंडळ, वेडिमाता मित्र मंडळाने सहकार्य केले. सप्ताहाचे आयोजन प्रल्हाद आनंदा बोंडे, शोभा प्रल्हाद बोंडे, बळीराम लक्ष्मण बोंडे, दीपाली बळीराम बोंडे, यतीन दत्तात्रय ढाके, प्रज्ञा यतीन ढाके यांनी केले होते.