भुसावळ- रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे यावल रोडवरील शासकीय गोदाम परीसरात शुक्रवार, 10 रोजी सकाळी 10 वाजता वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा होत आहे. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते श्री गजानन महाराज मंदिर रस्त्यादरम्यान 46 झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. या कार्यक्रमास आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, प्रभारी तहसीलदार संजय तायडे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन प्रोजेक्ट चेअरमन नितीन नंदवने, रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष सोनू मांडे व सचिव डॉ.मकरंद चांदवडकर यांनी केले आहे.