भुसावळ : सकल लेवा पाटीदार समाजातर्फे वधू-वर परीचय मेळाव्याचे आयोजन शनिवार, 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता संतोषी माता हॉलमध्ये करण्यात आले आहे. याप्रसंगी विवाहेच्छूक युवक-युवतीचे कौटुंबिक व शैक्षणिक माहिती असलेल्या परीचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुटुंबनायक रमेश विठू पाटील असतील तर प्रमुख अतिथी माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे, आमदार शिरीष चौधरी, आमदार संजय सावकारे, माजी खासदार उल्हास पाटील, नगराध्यक्ष रमण भोळे, अॅड.रोहिणी खडसे, महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाशराव पाटील, औरंगाबाद मित्र मंडळाचे अध्यक्ष मधुकर सरोदे, वासुभाऊ इंगळे, राजेश चौधरी, प्रदीप भोळे आदी उपस्थित राहतील. याप्रसंगी समाजातील विवाहोच्छुक युवक-युवती व समाजबांधवानी उपस्थिती द्यावी, असे आवाहन शहराध्यक्ष देवेंद्र वाणी, रुपेश चौधरी यांनी केले आहे.