भुसावळात उसामा उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना तांदळाचे वाटप

0

भुसावळ : शहरातील खडका रोड भागातील मायनॉरीटी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी संचलित उसामा उर्दु हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष उसामा अब्दुल रऊफ खान यांच्या हस्ते तांदुळ वाटप करण्यात आला. शाळेच्या आवारात अत्यंत काटेकोरपणे सोशल डिस्टन्स् पाळून तसेच मास्क लावून आलेल्या इयत्ता 5 वी ते 8 वी वर्गातील विद्यार्थींनी व विद्यार्थ्यांना हा शालेय पोषण आहाराचा तांदूळ शासन आदेशानुसार वाटप करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक हाजी सैय्यद नवैद, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.