भुसावळात एकाचा झाडाला गळफास

0

कारण गुलदस्त्यात ; अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन

भुसावळ:- शहरातील जुना सातारा भागातील बाभूळाच्या झाडाला 35 ते 40 वर्षीय वय असलेल्या इसमाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. शहर पोलिसांना माहिती कळताच शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेतली. दरम्यान, मयताची अद्याप ओळख पटलेली नसून तीन ते चार दिवसांपूर्वी त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.