भुसावळात एकाची आत्महत्या

0
भुसावळ- शहरातील मोहित नगराजवळील रहिवासी प्रमोद श्रावण ढाकणे (43) यांनी28 रोजी सकाळी नऊ वाजता पंख्याला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. शहर पोलिसात मयताचा मुलगा  जयेश प्रमोद ढाकणे, 18 (राधाकृष्ण रेडिडेन्सी) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार दत्तात्रय कोळी करीत आहेत.