भुसावळ– शहरातील आरएमएस कॉलनीत गणेश देवगीरकर यांच्या डोक्याला वीट मारून दुखापत केल्याप्रकरणी संजय रामेश्वर बोपले (30) व सुनिल मांडवे (30) यांच्याविरूध्द शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. टेरीसवर मोबाईलवर बोलू नको, असे म्हणत आरोपींनी वाद घालत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपींपासून जीवाला धोका असल्याने त्यांच्याविरूध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणी देवगीरकर यांनी केली आहे.