भुसावळ : शहरातील शांती नगरात शनिवारी रात्री आठच्या सुमारास मेाटर सायकल अंगावर आणल्याने वाद होवून त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यात विशाल उर्फ काली दिलीप सूर्यवंशी याने तेजस राजेंद्र सपकाळे यांच्या पेाटावर चाकूचे वार केले. यात तेजस गंभीर जखमी झाला. त्याच्यावर हॅास्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. शहरातील शांती नगरातील दत्त मंदीराच्या परिसरात विशाल उर्फ काली याने मेाटर सायकल तेजसच्या अंगावर आणली, यावेळी तेजस व काली याच्यात वाद झाले. यावेळी काली याने त्याच्या जवळील चाकूने वार केले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमीला डॅा. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा हॅास्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी संशयीताचे नाव मिळवित संशयीत विशाल उर्फ काली सूर्यवंशी याला घरून ताब्यात घेतले. जखमीची प्रकृती बरी नसल्याने त्याने रात्री जबाब दिला नाही, मात्र रविवारी निरीक्षक प्रताप इंगळे यांनी रविवारी दुपारी पुन्हा हॉस्पीटलला जात जखमी तेजस याचा जबाब घेऊन रात्री उशीरा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी संशयीत सूर्यवंशी याला अटक केली. पोलिस निरीक्षक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप चैाधरी पुढील तपास करीत आहे.