भुसावळात एकावर तलवार हल्ला ; दोघांविरूध्द गुन्हा

0

भुसावळ – आम्ही चोर्‍या करतो, अशी जनतेत बदनामी केल्याच्या संशयातून एकावर दोघांनी तलवार हल्ला केल्याची घटना शहरातील खडका चौफुलीवर शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. आशिक बेग असलम बेग (अयान कॉलनी, खडका रोड, भुसावळ) हे नमाज अदा करून घराकडे जात असतांना संशयीत आरोपी इस्माईल उर्फ शोलू रईस शेख (अयान कॉलनी, खडका रोड, भुसावळ) व गोलू राशीद (न्यू ईदगाह, भुसावळ) यांनी रस्ता अडवून बदनामी करतो या संशयातून तक्रारदारावर हल्ला करण्यात आल्याने डोक्यासह हाताला इजा झाली आहे.