भुसावळात एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न : दोघे आरोपी निर्दोष

0

भुसावळ- न्यायालयात दाखल असलेल्या केसेस मागे का घेतल्या नाहीत? अशी विचारणा करीत एकावर चाकूने हल्ला झाल्याची घटना 28 ऑक्टोबर 2012 रोजी खडका बसस्थानकाजवळ घडली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी योगेश देविदास तायडे व देविदास दलपत तायडे यांची भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.भागवत यांनी साक्षीदारांच्या जवाबात असलेली तफावत व पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. खटल्याबाबत माहिती अशी की, तक्रारदार संजय केशव सपकाळे यांना 28 ऑक्टोबर 12 रोजी दोघा आरोपींनी खडका बसस्थानकाजवळ अडवून न्यायालयात खटले मागे का घेत नाही म्हणून विचारणा करीत योगेश तायडे यांनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला होता तर देविदास तायडे यांनी तक्रारदाराचे हात धरून ठेवले होते. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर भुसावळ न्यायालयात त्याचे कामकाज चालले. आरोपीतर्फे अ‍ॅड.विवेक आवारे व अ‍ॅड.मनीष सेवलानी यांनी काम पाहिले.