भुसावळ : किरकोळ कारणावरून एकास लोखंडी फायटरने मारहाण करण्यात आल्याची घटना शहरामील मच्छीवाडा, जाम मोहल्ला भागात रविवार, 18 रोजी रात्री 9.45 वाजता घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार बिलाल अहमद मो.उस्मान (35, मच्छीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) हे भावाच्या मुलांसाठी दुध घेवून जात असताना संशयीत आरोपी गफूर अयुब पठाण उर्फ वाहिद पठाण (मच्छीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत फिर्यादीस पाठीवर व उजव्या खांद्यावर फायटरने मारहाण केली. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक संदेश निकम करीत आहेत.