भुसावळात एलईडी दिव्यांचा लखलखाट ; नाथाभाऊंच्या वाढदिवसाची अनोखी भेट

0

सात वर्षापर्यंत पालिकेच्या खर्चात बचत -नगराध्यक्ष रमण भोळे

भुसावळ- शहरातील आठ हजार 200 खाबांवर एलईडी दिवे बसविण्याच्या कामाला माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसापासून अर्थात रविवारपासून सुरवात झाली. नगराध्यक्ष रमण भोळे व नगरसेवकांच्या उपस्थितीत श्री गजानन महाराज मंदिर परीरसरापासून या कामाला सुरवात झाली. यामुळे आगामी सात वर्षांत पालिकेच्या पथदिव्यांच्या वीजवापर कमी होऊन 50 टक्के वीज बिलाच्या रक्कमेत बचत होवून एलईडी दिव्यांनी शहर उजळणार आहे. नगरपालिकेने एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीसोबत सात वर्ष एलईडी दिवे बसविण्याचा करार केला आहे.

सात वर्ष दिव्यांची गॅरंटी
या करारांतर्गत शहरात सात वर्ष वीज पथदिवे बसविणे, त्यांची वेळोवेळी दुरुस्ती करणे, फ्यूज झालेले पथदिवे 24 तासांच्या आत बदलणे, पालिकेच्या विजेची बचत करणे आदी सर्व कामे ईईएसएल या कंपनीच्या माध्यमातून होणार आहेत. रविवारी या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, शिक्षण सभापती अ‍ॅड. बोधराज चौधरी, किरण कोलते, गिरीष महाजन, परीक्षीत बर्‍हाटे, प्रा.प्रशांत पाटील, रमाशंकर दुबे, चंद्रशेखर इंगळे आदींसह नगरसेवक उपस्थित होते. पालिकेला दरवर्षी पथदिव्यांच्या वीज बिलापोटी एक कोटी 40 लाख रुपयांचे वीज बिल भरावे लागते. आता 50 टक्के वीज बचत होणार आहे.