भुसावळात एसटी बसच्या धडकेत शिक्षक जखमी

0

भुसावळ- मेहकर आगाराच्या बसने धडक दिल्याने शिक्षक जखमी झाल्याची घटना शहरात 11 रोजी सकाळी 10.30 वाजता जामनेर रोडवर घडली. या प्रकरणी बुधवारी बाजारपेठ पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्षक योगेश अर्जुन घोरपडे (31, नागसेन कॉलनी) हे दुचाकीवरून जात असताना बस (एम.एच.20-2668) चा धक्का लागून बसचे चाक त्यांच्या पायावरून गेल्याने त्यांना ईजा झाली. रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्यांनी बुधवारी फिर्याद दिली. तपास नाईक नरेंद्र चौधरी करीत आहेत.