भुसावळात एस.टी.चालकाला मारहाण : दोघा आरोपींना अटक

0

भुसावळ : कट लागल्याच्या कारणावरून एस.टी.चालकाला दोघांनी मारहाण केल्याची घटना 5 डिसेंबर रोजी शहरात घडली होती. या प्रकरणी एस.टी.चालक राजेश लिलाधर पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयीत भुसावळातील खडका चौफुली भागात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अझरुद्दीन शेख रिसालोद्दीन (30, रा.ग्रीन पार्क, भुसावळ) व ईस्माईल रमजान गवळी (30, रा.जुना सातारा मामाजी टॉकीजजवळ, गवळी वाडा, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, अनिल मोरे, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, उमाकांत पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे आदींच्या पथकाने केली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, सुभाष साबळे करीत आहेत.