भुसावळात ओमनी पेटली

0

नगरसेवकांच्या सतर्कतेने प्राणहानी टळली

भुसावळ – शहरातील जामनेर रोडवरील अ‍ॅक्सिस बँकेजवळ चारचाकी ओमनी (क्र. एम.एच.19 ए.पी.0148) ने अचानक पेट घेतल्याने यंत्रणेची धावपळ उडाली. ओमनीतील सिलेंडर लिक झाल्याने आग लागल्याचा संशय आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर नगरसेवक पिंटू कोठारी, नितीन धांडे आदींनी प्राणाची पर्वा न करता बँक ऑफ बडोदामधून अग्निरोधक सिलेंडर आणून आग विझवली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने प्राणहानी टळली. बाजारपेठ पोलिसांना घटना कळताच त्यांनीही धाव घेतली. बाजारपेठ पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार ही गाडी बोदवड येथील असून ती चालक शेख रईस शेख शब्बीर कुरेशी चालवत असल्याचे सांगण्यात आले. बाजारपेठ पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले.