भुसावळात कर्मचारी शिबिरात 11 तक्रारींची जागेवरच निरसन

0

आधूनिक वाटचालीत कर्मचार्‍यांनी रहावे अपडेट- डीआरएम आर.के.यादव

भुसावळ– रेल्वेची आधूनिकतेकडे वाटचाल सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून रेल्वेतील कर्मचार्‍यांची माहिती ही ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना एका क्लिकवर कर्मचार्‍यांना त्यांच्या नोकरीबाबतची माहिती मिळू शकत आहे, तरीही काही अडचणी असल्यास त्यांनी प्रत्यक्ष येऊन भेटावे, असे आवाहन डीआरएम आर.के. यादव यांनी केले. डीआरएम कार्यालयाच्या परीसरात गुरूवारी सकाळी 11 वाजता तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात 51 पैकी 11 समस्या जागेवरच सोडविण्यात आल्यात. शिबीराचे प्रास्ताविक वरीष्ठ कार्मिक अधिकारी डॉ. तुशाबा शिंदे यांनी केले. रेल्वे प्रशासनाने कर्मचार्‍यांसाठी केलेल्या विविध ऑनलाईन योजनेची माहिती यावेळी उपस्थित कर्मचार्‍यांना दिली. डीआरएम यादव यांनी बोलतांना सांगितले की, कर्मचार्‍यांना त्याच्या नोकरीच्या कामानिमित्त काही अडचणी आल्यास त्यांनी तत्काळ रेल्वेच्या ऑनलाईन नेटवर माहिती पाहून घ्यावी, काही अडचण असली आणि ती सुटत नसली तरच कार्यालयात यावे, सर्व कर्मचार्‍यांचा डाटा अपडेट करण्यात आला आहे. ज्या कर्मचार्‍यांनी अद्यापही त्यांचे मोबाईल क्रमांक दिले नसतील त्यांनी ते तत्काळ जमा करावे, विभागातील सर्व डेपो रेलनेटशी जोडले जात आहे. त्याचा ठेका दिला आहे, त्यामुळे विभागातील कामाचे परीपूर्ण ऑनलाईन नेटवर्कीग राहणार आहे. यावेळी एडीआरएम मनोज सिन्हा यांनीही मार्गदर्शन केले.