भुसावळात कवी गणेश आघाव उद्या फुलवणार कवितेचा मळा

भुसावळ : प्रागतिक विचार मंच, अटल प्रतिष्ठान व डाॅ. राजेश मानवतकर बहुउद्देशिय संस्थेतर्फे भुसावळात हिंगाेलीचे कवी गणेश आघाव यांचा ‘कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला’ हा २५५२वा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला आहे. आर. जी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुरुवारी (दि.३१) सकाळी ८.३० वाजता हा कार्यक्रम हाेईल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. जी. झांबरे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. कुमावत असतील. प्रमुख पाहुणे म्हणून अटल प्रतिष्ठानच्या सचिव विनिता सुनील नेवे, डाॅ. राजेश मानवतकर बहुउद्देशिय संस्थेच्या सचिव डाॅ. मधू मानवतकर, प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष मुख्याध्यापक जे. पी. सपकाळे, प्रागतिक चळवळीचे अभ्यासक प्रा. डाॅ. जतिन मेढे यांची उपस्थिती असेल. कवी आघाव यांच्या ‘पाेरी शाळेत निघाल्या’ कवितेचा ३२ आंतरराष्ट्रीय भाषा व सर्वच बाेलीभाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांच्या याच कवितेचा जपानी भाषेतील अनुवाद आता जपानच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ आहे. देशभरातील अडीच हजारांवर शाळांमध्ये कवितेच्या कार्यक्रमाचे यशस्वी सादरीकरण त्यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशाेधन मंडळ (पुणे) या संस्थेचे ते सदस्य आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कवयित्री बहिणाबाई चाैधरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.” मातीच्या कविता” , “बारभाई”, “मातीला फुटले हात”, “आघाववाडीची गाणी” हे त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित आहेत.

साहित्य रसिकांनी या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन प्रागतिक विचार मंच , अटल प्रतिष्ठान, डॉ. मानवतकर बहूउद्देशिय संस्था या आयोजक संस्थानीं केले आहे.