भुसावळ- शहरात वाळू माफियांची दबंगगिरी वाढली असून जप्त करण्यात आलेले वाळूचे दोन डंपर तहसील कार्यालयाच्या जुन्या व नव्या आवारातूनच लांबवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारातून डंपर (एम.एच.19 जे.3454) तसेच नवीन तहसील कार्यालयाच्या परीसरातून डंपर (एम.एच.18 एम. 4814) लांबवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शहर पोलिसात या प्रकरणी कुर्हे पानाचे येथील मंडळाधिकारी शशीकांत इंगळे व तलाठी ज्ञानेश्वर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार साहील तडवी करीत आहेत.