भुसावळात कुटुंबावर प्राणघातक हल्ला : दोघांची जामिनावर सुटका

भुसावळ : शहरातील समता नगर भागात माजमी नगरसेवक रवींद्र खरात यांच्यावर हल्ला होताना आशीष आलोटकर परीवाराने मदत न केल्याच्या रागातून 21 एप्रिल 2022 रोजी संशयीत आतीष खरासह पप्प्या साळवे, आकाश खिल्लारे यांनी घरात शिरून कुटुंबियांना मारहाण केली होती तसेच कुटुंबातील सदस्यांना ओलिस ठेवले होते. या प्रकरणी अटकेतील आकाश खिल्लारे व सुमित घनघाव यांना भुसावळ सत्र न्यायालयाचे न्या.आर.एम.जाधव यांनी जामीन मंजूर केला आहे. संशयीत आरोपींतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण आर.पाल तर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.मोहन देशपांडे यांनी काम पाहिले. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.