भुसावळात कोम्बिंगमध्ये गवसले दोन हद्दपार आरोपी
पाच समन्सची पोलिसांकडून बजावणी ; नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपीला अटक ः गावठी दारू विक्रेत्याला अटक
भुसावळ : शहरातील अप्रिय घटनांना आळा बसण्यासाठी शहरात पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात गुरुवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यात हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींच्या घरी जावून तपासणी करण्यात आल्याने त्यात दोन आरोपी शहरात आढळल्याने त्यांना अटक करण्यात येवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोम्बिंगदरम्यान पाच समन्सची बजावणी करण्यात आली तसेच नॉन बेलेबल वॉरंटमधील एका आरोपीला अटक करण्यात आली व गावठी दारू विक्री करणार्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांच्या या कारवाईने गुन्हेगारांच्या गोटात खळबळ उडाली.
या आरोपींना अटक
शहरातील विविध भागात पोलिसांनी राबवलेल्या कोम्बिंगमध्ये एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्यानंतर दोन आरोपी शहरात वास्तव्यास दिसून आल्याने त्यांना अटक करण्यात आली. हेमंत ऊर्फ (सोन्या) जगदीश
पैठणकर (27, रा.भिरुड हॉस्पिटलजवळ, भुसावळ) व चेतन ऊर्फ (गुल्या) पोपट खडसे (28, रा.हनुमान नगर, केळकर हॉस्पिटलजवळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपींनी हद्दपारीचे उल्लंघण केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गावठी दारूची विक्री करणार्यास अटक
भुसावळ शहरातील वाल्मीक नगर भागातील रामदेव बाबा मंदिराजवळ संशयीत आरोपी भीमराव जानु इंगळे (75) हा 600 रुपये किंमतीची 15 लीटर गावठी दारू तसेच 20 लीटरच्या प्लॉस्टीकच्या कॅनमध्ये स्वत:च्या फायदयासाठी विना परवाना गावठी हात भटीची दारू आढळल्याने ती जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. कोम्बिंगदरम्यान नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपी शेख मुजमील शेख शब्बीर (30, रा.ग्रीन पार्क, भुसावळ) यास अटक करण्यात आली तसेच पाच समन्सची बजावणी करण्यात आली.
यांनी राबवले शहरात कोम्बिंग ऑपरेशन
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे सहा.निरीक्षक कृष्णा भोये, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, हवालदार वाल्मीक सोनवणे, कृष्णा देशमुख, नेव्हील बाटली, रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, चंद्रकांत बोदडे, समाधान पाटील, महेश चौधरी, यासीन पिंजारी, योगेश माळी, प्रशांत परदेशी, परेश बिर्हाडे , कर्तारसिंग परदेशी, सचिन चौधरी आदींनी केली.