भुसावळात कोम्बिंगमध्ये 32 वाहनांवर कारवाई ; जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट

0

भुसावळ- जिल्हाभरात शुक्रवारी रात्री ऑल आऊटचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिल्यानंतर शहरातही पोलिसांनी कोम्बिंग राबवत 32 वाहन धारकांवर कारवाई केली तसेच गुन्हेगारांच्या घरांची झडती घेण्यात आली मात्र आक्षेपार्ह काहीही आढळले नसल्याचे डीवायएसपी गजानन राठोड म्हणाले. रात्री जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे व अपर पोलिस अधीक्षक लोहीत मतानी यांनी भेट माहिती जाणून घेतली.

पाच तास पोलिसांकडून कारवाई
शहरातील शहर, बाजारपेठ व तालुका पोलिस ठाणे हद्दीत रात्री 10 ते पहाटे पाच दरम्यान कोम्बिंग राबवल्यानंतर नाकाबंदी करण्यात आली. यात गांधी पुतळा, वाय पॉइंट, नाहाटा चौफुली, खडका रोड, बाजारपेठ पोलिस ठाणे येथे नाकाबंदी करण्यात आली होती तर शहरातील वाल्मीक नगर, वैतागवाडी भागात गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला मात्र आक्षेपार्ह काहीही आढळले नाही. नाकाबंदीत विना क्रमांकाची एक मोटर सायकल पोलिसांनी जप्त केली आहे. गाडीचे कागदपत्रे दाखवून गाडी सोडली जाईल, असे पोलिस म्हणाले. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कारवाईबाबत माहिती घेत गुन्हेगारांना न सोडण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, शेतकर्‍यांनी बँक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स व मोबाईल नंबर ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी, कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक यांच्याकडे दोन दिवसांत जमा करावी, असे आवाहन तहसील विभागाकडून करण्यात आले आहे.