नोकरीवाल्या मुलाचीच अपेक्षा न ठेवता उद्योजक, शेतकरी मुलाचीही ठेवावी अपेक्षा -जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे
भुसावळ- शहरातील गजानन महाराज नगरातील कोळी समाजाच्या मंगल कार्यालयात रविवारी समाजाचा वधू-परीचय मेळावा झाला. त्यात सुमारे 400 युवक-युवतींनी आपला परीचय दिला. प्रसंगी जिल्हा परीषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी इच्छूक वधूंना उद्देशून केवळ नोकरीवाल्या मुलामागे धावण्याऐवजी उद्योजक तसेच शेतकरी मुलांचीही अपेक्षा ठेवावी, असे आवाहन करीत हुंडा पद्धत्ती, साखरपुडा, मानपान या गोष्टींना फा देण्याचेही समाजाला आवाहन केले.
यांची होती प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वधू-वर परीचय समितीचे अध्यक्ष भागवत ढेमा सपकाळे होते. दिवाकर पाटील, सतीश सपकाळे, वसंत मोंढे, गिरधर कोळी, रामदास कोळी, व्ही.पी.कोळी, गोपाळ तायडे, अरुण कोळी, अरुण सूर्यवंशी, शांताराम बुटे, पन्नालाल सोनवणे, सुधाकर कोळी, निलेश पाटील यांच्या हस्ते वाल्मीक ऋषींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
समाजातील वाढते घटस्फोट चिंताजनक
मंडळाचे सहसचिव चंद्रकांत सूर्यवंशी म्हणाले की, मुला-मुलींमध्ये किरकोळ कारणावरून होणारे घटस्फोट चिंताजनक बाब आहे. ते टाळण्यासाठी एकमेकांना समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगत आगामी उपक्रमांची माहिती दिली. वसंत मोरे यांनी समाजातील मुलींच्या वाढत्या वयाबद्दल चिंता व्यक्त केली.
यशस्वीतेसाठी यांनी घेतले परीश्रम
वधू-वर परीचय समितीचे अध्यक्ष भागवत सपकाळे, कार्यकारी अध्यक्ष दीपक सोनवणे, महारू विठोबा, पिंप्रीकर गुरूजी, लिलाधर सपकाळे, शांताराम कोळी, दत्तात्रय सपकाळे, उत्तम कोळी, हेमंत कोळी, नारायण भोलाणकर, नारायण कोळी, शशीकांत सपकाळे, सुखदेव चित्ते, प्रमोद कोळी, मुकेश कोळी, चंद्रकांत सपकाळे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमासाठी कोळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, उपाध्यक्ष नितीन सोनवणे, सचिव वसंत सपकाळे, सहसचिव चंद्रकांत सूर्यवंशी, खजिनदार अभिमन्यू सोनवणे, अंतर्गत हिशोब तपासणीस प्रकाश सपकाळे, सदस्य अर्जुन सपकाळे, दिलीप कोळी, लखीचंद बाविस्कर, बन्सी मोरे, वसंत मोरे, रवींद्र बाविस्कर, विजय तावडे, धर्मराज तायडे आदींनी सहकार्य केले.