भुसावळात कोळी समाज वधू-वर परीचय सुचीचे प्रकाशन

0

भुसावळ- कोळी समाज विकास मंडळाच्या गजानन महाराज नगरातील समाजाच्या सभागृहात कोळी समाजाच्या वधू-वर परीचय सुचीचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी रवींद्र पवार, ज्ञानेश्‍वर सोनवणे, वसंत सपकाळे, भागवत ढेमा सपकाळे, सतीश सपकाळे, अभिमन्यू सोनवणे, नितीन सोनवणे, लखीचंद बाविस्कर यांच्या हस्ते सूचीचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी दीपक सोनवणे, महारू विठोबा कोळी, रवींद्र बाविस्कर, दत्तात्रय सपकाळे, लिलाधर सपकाळे, रोहिदास सोनवणे, धर्मराज कोळी, शांताराम कोळी, प्रदीप सपकाळे, सोपान पवार आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन चंद्रकांत सूर्यवंशी तर आभार दीपक सोनवणे यांनी मानले.