भुसावळात खोट्या कागदपत्रांद्वारे प्लॉट हडपल्याची तक्रार

0

भुसावळ- खोट्या कागदपत्रांद्वारे प्लॉट हडपल्याची तक्रार शहरातील मो.अय्युब मो.मसुद यांनी जिल्हाधिकारी तसेच लोकायुक्तांकडे केली आहे. तक्रारदारने 2013 मध्ये पालिका हद्दीतील सर्वे
नं.53/3/1/2 पैकी प्लॉट नंबर एक हा सुशीलाबाई केशवराव रामवंशी यांच्याकडून 20 एप्रिल 2013 रोजी रजिस्टर खताने खरेदी केला होता मात्र प्लॉट खरेदी केल्यापासून अरशद खान अकादिता खान (मयत) व वारस जावेद खान अरशद खान व इतरांनी त्या प्लॉटवर कब्जा केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. संबंधित व्यक्ती सावकार असल्याने त्यांचे अधिकारीवर्गाशी संबंध असल्याचाच आरोपही करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, पालिका मुख्याधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली, भूमी अभिलेख विभागाने मोजणी केली मात्र अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे तक्रारदाराने कळवले आहे.