भुसावळात गर्दी टाळण्यासाठी सहा भागात सुरू केला भाजीपाला बाजार

0

डेलि बाजार बंद : घराजवळील बाजारातून भाजीपाला घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

भुसावळ : शहरातील डेलि बाजारात नागरीकांची मोठी गर्दी होत असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने प्रशासनाने हा बाजार बंद केला असून शहरातील विविध सहा ठिकाणी भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला आहे. नागरीकांनी घराजवळील या बाजारातून भाजीपाला खरेदी करावा मात्र सोशल डिस्टन्स पाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

शहरातील या भागात भरणार भाजीपाला बाजार
शहरातील सहा ठिकाणी म्हणजेच भुसावळ हायस्कूल मैदान, टीव्ही टॉवर मैदान, खडकारोडवरील शाळा क्रमांक तीन, गडकरी नगरातील शंभुराजे चौक, मातृभूमी चौक, जामनेर रोडवरील विकास कॉलनी येथे भाजीबाजार भरवला जात असून नागरीकांनी येथूनच भाजीपाला विकत घ्यावा, शहरात येऊ नये, असे आवाहन केले आहे.