भुसावळात गावठी कट्टा पकडला

0
भुसावळ : शहरातील यावल नाका भागात एका संशयित आरोपीजवळ गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यावरून शहर पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या ताब्यातून पाच हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला आहे. जितेंद्र किसन पाटील (समर्थ नगर, घोडे पिर बाबा दर्गा जवळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 9 रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास आरोपी यावल नाक्यावर आल्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्याचा तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोहम्मद अली सय्यद करीत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसात गावठी कट्टा पकडण्याच्या घटना पाहता भुसावळ शहर हे शस्त्र तस्करीचे केंद्र ठरू पाहत आहे.