भुसावळात गावठी कट्ट्यासह आरोपी जाळ्यात

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची गोपनीय माहितीवरून यशस्वी कामगिरी : 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त

भुसावळ : बाजारपेठ पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणार्‍या संशयीताच्या गोपनीय माहितीच्या आधारे मुसक्या आवळल्या आहेत. रोहन पितांबर पाटील (23, रा.गजानन महाराज मंदिराजवळ , कंडारी, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ शहरातील हिरा हॉल परीसरात एक संशयीत गावठी कट्टा कंबरेला लावून फिरत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास धाव घेत संशयीताला ताब्यात घेतले. संशयीताच्या अंगझडतीत 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त केला. आरोपीविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घायतल, एएसआय तस्लीम पठाण, सहा.फौजदार शरीफोद्दिन काझी, हवालदार मिलिंद कंक, सत्तार शेख, नाईक दीपक कापडणे, योगेश माळी, प्रणय पवार आदींच्या पथकाने केली. या गुन्हयाचा तपास परीविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक महेश घायतल करीत आहेत.