भुसावळ ः गावठी कट्ट्यासह दोन जणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. डिगंबर कहार (19, रा.सात नंबर चौकी मागे, भुसावळ) व कुणाल कलोसीया (20, रा.सात नंबर चौकी मागे, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध शहर पोलिसात मध्यरात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी शहर पोलीस ठाणे हद्दीतील पाच चोर्यांच्या उकल सह फैजपूर लूट प्रकरणाची उकल करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या तर पुन्हा भुसावळातून कट्टा जप्त केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.