भुसावळ: गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस बाळगणार्या एकास बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने गुरुवारी सायंकाळी अटक केली. निखील रमेश राखुंडे (19, श्रीकृष्ण नगर, जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जामनेर रोडवरील खेडी रोड परीसरात संशयीत आरोपीकडे गावठी कट्टा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक लतीफ तडवी, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक नरेश ठाकरे, उपनिरीक्षक निशीकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.