भुसावळात गावठी कट्ट्यासह संशयीत जाळ्यात

0

बाजारपेठ डीबी पोलिसांची कामगिरी ; जंक्शन ठरतेय शस्त्र तस्करीचे केंद्र

भुसावळ- पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगाराकडून बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने कट्टा जप्त केला. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नाहाटा चौफुली भागात ही कारवाई करण्यात आली अभिषेक राजेश शर्मा (20, रा.चमेली नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संशयीताविरुद्ध यापूर्वी शरीरावरील ईजा करणे तसेच डीजे साहित्य चोरीचा गुन्हा दाखल आहे.

गुप्त माहितीनुसार आरोपीला अटक
पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोलिस उपनिरीक्षक निशीकांत जोशी, हवालदार सुनील जोशी, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण, अक्षय चव्हाण आदींनी सापळा रचून आरोपीस अटक केली. आरोपीच्या ताब्यातून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहे. दरम्यान, भुसावळ शस्त्र तस्करीचे केंद्र ठरत असून यापूर्वीही गुन्हेगारांवर गावठी जप्त करण्यात आल्याची घटना घडल्या आहेत.