एक जिवंत काडतुसही जप्त ; बाजारपेठ पोलिसांची कारवाई
भुसावळ- शहरातील रेल्वे स्टेशन परीसरातील गार्ड लाईन जवळील चर्चजवळ एका संशयीताकडे कट्टा असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयीतास अटक केली. आरोपीच्या ताब्यातून पाच हजार रुपये किंमतीचा कट्टा व पाचशे रुपये किंमतीचे जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. विकास उर्फ (विक्की) विलास राजपुत (32, रा.जुनी जीन, गमाडीया प्रेसजवळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, उपअधीक्षक लोहित मतानी, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार अंबादास पाथरवट, तस्लिम पठा, दीदपक जाधव, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, कृष्णा देशमुख, राहुल चौधरी आदींनी केली. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार माणिक सपकाळे करीत आहे.