भुसावळ : शहरातील विक्रांत उर्फ विक्की गणेश देवपुजे (वरणगाव रोड, शिवाजी नगर, भुसावळ) याच्याकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे पोलिस नाईक कमलाकर बागुल यांना मिळाल्यानंतर 21 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जुगा देवी परीसरातून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्टा तसेच एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू रोहम, एएसआय अशोक महाजन, राजेंद्र पाटील, सुनील दामोदरे, कमलाकर बागुल, गफुर तडवी, अरुण लाडवंजारी, किरण धनगर, चालक इद्रीस पठाण आदींच्या पथकाने केली.