भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई : जंक्शन ठरू पाहतेय शस्त्र तस्करीचे ‘जंक्शन’
भुसावळ : शहरातील जुन्या नगरपालिका शेजारी असलेल्या हॉटेल पंचालीसमोर एका संशयीताकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करीत संशयीताला 15 हजार रुपये किंमतीच्या गावठी कट्टाासह बुधवारी सकाळी 10.30 वाजता अटक केली. सईद शेख अमीर शेख (28, रा.पापानगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युवराज नागरुत, नाईक रवींद्र बिर्हाडे, किशोर महाजन, यासीन पिंजारी, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, श्रीकृष्ण देशमुख, प्रशांत परदेशी, अक्षय चव्हाण आदींच्या पथकाने केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल असून तपास रवींद्र बिर्हाडे करीत आहेत.