भुसावळ- शहर पोलिस ठाणे हद्दीतील कवाडे नगर भागात गावठी दारू विकली जात असल्याची गुप्त माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करीत तीन हजार 200 रुपये किंमतीची गावठी दारू जप्त करीत एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आकाश रमेश परदेशी (यल्लमा नगर) असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार, हवालदार रमेश चौधरी, रवींद्र पाटील, दादाभाऊ पाटील आदींच्या पथकाने केली.