भुसावळात गावठी पिस्टलासह आरोपी जाळ्यात

जळगाव गुन्हे शाखेची गोपनीय माहितीवरून कामगिरी

भुसावळ : गावठी बनावटीच्या पिस्टलासह एका आरोपीला जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शहरातील चितोडे वाणी मंगल कार्यालयाजवळ मंगळवार, 16 रोजी करण्यात आली. खुशाल उर्फ बंटी गजानन बोरसे (25, खडका रोड, रामदासवाडी, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक जालिंदर पळे, एएसआय अशोक महाजन, हवालदार लक्ष्मण पाटील, हवालदार संदीप सावळे, नाईक किशोर राठोड, नाईक रणजीत जाधव, नाईक श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल ईश्‍वर पाटील, चालक हवालदार विजय चौधरी आदींच्या पथकाने केली.