भुसावळ- शहरातील वाल्मीक नगर, 72 खोली भागात एक जण गावठी हातभट्टीची दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून संशयीतास पोलिसांनी अटक करीत एक हजार 800 रुपये किंमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली तर अन्य रसायने नष्ट करण्यात आली. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, सुनील थोरात, संजय भदाणे, दीपक कापडणे, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, दीपक जाधव, प्रशांत चव्हाण, योगेश माळी आदींनी ही कारवाई केली. भीमराव जानु इंगळे (75, रा.वाल्मीक नगर, 72 खोली, भुसावळ) यास अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध कृष्णा देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.