भुसावळ – शहरातील न्यू पोर्टर चाळ भागात एकाकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 200 रुपये किंमतीची व 12.5 इंचेची धारदार गुप्ती जप्त करण्यात आली. या प्रकरणी मोहम्मद हाशीम मो. सलीम (न्यू पोर्टर चाळ, भुसावळ) यास अटक करण्यात आली. 14 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गजानन देशमुख करीत आहे.