भुसावळ । शहरातील भारतनगर व पवन नगर येथे झांबरे बंधूंवर झालेल्या गोळीबारप्रकरणी सोमवार 3 रोजी पहाटे 5.30 वाजेदरम्यान नाहाटा चौफुली येथून आकाश माने यास पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आकाश लक्झरीने येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. एएसआय मनोज ठाकरे, आनंदसिंग पाटील, विलास सातदिवे यांच्या पथकाने सापळा रचून आकाश हा लक्झरीतून उतरताच त्याला अटक केली.
सूत्रधार फरार
गेल्या रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास अट्टल व हद्दपार आरोपी मुकेश भालेरावसह अन्य सहा जणांनी निखील झांबरे या तरुणावर गोळीबार करून जखमी केले होते. तर भारत नगरात हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून दहशत पसरवली होती़ आरोपींनी दोन घरांमध्ये जावून कुलरसह दरवाजाचे तसेच दुचाकीचे नुकसान करुन भाजीविक्रेत्यासह बालकावर बंदुक रोखली दुसरा आरोपी गौरव बढे याला ताब्यात घेतले. गोळीबारप्रकरणी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले मुकेश भालेराव व एक आरोपीचा तपास करीत आहे.
यांना घेतले ताब्यात
या प्रकरणी आधी भुसावळ पोलिसांनी रणविर (राणू बॉक्सर) विजय इंगळे (रा.शांती नगर भुसावळ), करण किशन इंगळे (रा.राहुल नगर, भुसावळ), दीपक श्रावण लोखंडे (आरपीएफ बॅरेक जवळ, भुसावळ) या तिघांना ताब्यात घेतले होते. यात आता आकाश माने आणि गौरव बढे यांची भर पडली आहे. मात्र यातील एक मुख्य सुत्रधार मुकेश भालेराव हा फरार असून पोलीस पथक त्याचा कसून शोध घेत आहेत.