एकनाथराव खडसे ; मुख्यमंत्री दौर्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
भुसावळ- रेल्वे हद्दीतील अतिक्रमणधारकांना हक्काचे घरकुल उपलब्ध होणार असून त्यांच्यासोबतच शहरातील इतर बेघर नागरीकांनाही मोफत घरे दिली जाणार असून भुसावळात 21 रोजी येत असलेले मुख्यमंत्री घरकुलांसंदर्भात मोठी घोषणा करतील, अशी माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे दिली. शहरातील डी.एस.ग्राऊंडवर दौर्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्ता व पदाधिकार्यांशी संवाद साधला.
व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, मनोज बियाणी, पंचायत समितीच्या सभापती प्रीती पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैलजा पाटील, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन
माजी मंत्री खडसे म्हणाले की, शहरात अमृत योजना, रस्ते, भूमिगत गटारी, उद्यानांचा विकास केला जात आहे. पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार असल्याचे ते म्हणाले. प्रा.सुनील नेवे म्हणाले की, शहरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंधरा कोटींच्या निधीतून रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन, प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण, उद्यानाचे लोकार्पण, आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, रेल्वेच्या सावदा, निंभोरा आणि बोदवड येथील ओव्हरब्रीजचे भूमिपूजन, आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थींना हेल्थ कार्डचे वाटप केले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी दोनशे कार्यकर्त्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीकडून नियोजन केले जात आहे. यावेळी बैठकीत माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, किरण कोलते, नगरसेवक पिंटू कोठारी, वसंत पाटील, बोधराज चौधरी, रमेश मकासरे, अमोल इंगळे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, पवन बुंदेले, नारायण कोळी आदींची उपस्थिती होती.