भुसावळात घरफोडी : 40 हजारांचा ऐवज लंपास

भुसावळ : कुटुंब लग्नाला गेल्याची संधी चोरट्यांनी साधत 40 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना शहरात 3 रोजी सकाळी उघडकीस आली, रत्ना राजेश परदेशी (रा.डॉक्टर इक्बाल यांच्या दवाखान्याजवळ, जाम मोहल्ला, भुसावळ) हे लग्नासाठी 23 जानेवारीला धुळे येथे कुटुंबीयांसमवेत गेले असता 10 दिवसांनंतर त्या 3 फेब्रुवारी रोजी सकाळी भुसावळातील घरी आल्यानंतर त्यांचा चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडत प्रवेश करीत सुटकेसमध्ये ठेवलेले 20 हजार रोख तसेच 20 हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबविले. बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, निलेश चौधरी, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, जितेंद्र पाटील यांनी पाहणी केली. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत.