भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील अमरनाथ नगरातील रहिवासी बाळकृष्ण कैलासचंद ठाकूर यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचे लोखंडी ग्रीलची कडी तोडून आत प्रवेश केला. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकण्यात आला मात्र घरातील कुठलाही किंमती सामान नसल्याने चोरट्यांनी रीकाम्या हाताने परतावे लागले. ठाकूर यांनी तापी नगरात नवीन घर घेतल्याने त्यांचे वास्तव्य तेथे असल्यानेज जुन्या घराला कुलूप असल्याने चोरट्यांनी संधी साधली मात्र सुदैवाने घरात कुठलाही किंमती सामान नसल्याने त्यांचे नुकसान टळला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी करीत आहेत.