भुसावळ- येथील शिवाजी नगर मधील पंजाबी किराणा शेजारील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्याच्या बंद घराच्या दरवाज्याची कडी उघडून अज्ञात चोरट्यांनी रोकड व साहित्य चोरून नेल्याची घटना आज दि.15 ऑऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या कार्मिक विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक शेख मोहम्मद सलीम मोहम्मद अमिर हे दि.4 ऑक्टोबर रोजी परिवारासह नाशिक येथे गेले होते. या दरम्यान त्यांच्या बंद घराच्या मागील दरवाज्याची कडी उघडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील 27 हजार रुपये रोख ,जुने घराचे कागदपत्र,वाशिंग मशीन, वॉटर पुरिफायर आरओ मशीन,एलसीडी हे साहित्य चोरून नेले.याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.