भुसावळात घरफोडी : 24 हजारांचा मुद्देमाल लंपास

भुसावळ : शहरातील पाटीलमळा भागातील रहिवासी जालना येथे कामानिमित्त गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्याने साधली. मंगळवारी रहिवाशांना घरफोडी झाल्याची माहिती कळताच त्यांनी घर मालक व बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवली. बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.

रोकडसह दागिने लंपास
रेल्वेच्या पार्सल ऑफिसमध्ये लिपिक असलेले शेख अल्ताफ शेख मुस्ताक पाटीलमळ्यात राहतात. शेख कुटुंबा जालन्यात लग्नाला गेल्याने घराला कुलूप असून चोरट्यांनी संधी साधत लहान मुलांची अंगठी, कडे, सोन्याचे मणी, चांदीचा कमरपट्टा व रोकड मिळून सुमारे 25 हजारांचा मुद्देमाल लांबवला.
घर मालक बुधवारी भुसावळात आल्यानंतर या प्रकरणी फिर्याद देणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.