भुसावळात चहा विक्रेत्यास लूटले ; दुसरा पसार आरोपीही जाळ्यात

0

भुसावळ- चहा विक्रेत्यास मारहाण करून लूटल्याप्रकरणी विष्णू पथरोड यास बाजारपेठ पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती तर दुसरा पसार साथीदार नरेश उर्फ नारू शंकर डगलज (30, रा.72 खोली, वाल्मिक नगर, भुसावळ) हा रविवारी घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्याही बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

चहा विक्रेत्यास मारहाण करून लुटल्याने गुन्हा
रेल्वेत चहा विक्री करून उदरनिर्वाह करणार्‍या सागर साहेबराव अहिरे यास 27 रोजी रात्री टिंबर मार्केटजवळ अडवून आरोपी विष्णू पथरोडसह नरेश डगलज यांनी मारहाण करीत त्याच्या डोक्यात वीट मारून नऊ हजार रुपये लुटले होते. या प्रकरणी अहिरे यांच्या फिर्यादीवरून दोघा आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी रात्री विष्णू पथरोड यास अटक केल्याने त्यास शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 31 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती तर रविवारी दुसरा पसार संशयीत नरेश डगलज यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजाजन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिस शेख, सहाय्यक फौजदार तस्लिम पठाण, हवालदार सुनील जोशी, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, रवींद्र तायडे आदींच्या पथकाने केली.